Pages

Friday, October 29, 2010

शहीदांनो तुमच्या साठी...

विरांनो लढा तुम्ही सिमेवर
आमच्या नजरा तुम्हावर;
हे पाहण्यास...तुम्ही कसे लढता..
नाही नाही तुम्ही कधी मरता....
का? विचारू नका,
आम्ही वाट पाहत आहोत,
तुमच्या विरमरणाची;
नंतर, निदान वर्षभर गाण्य़ाची,
तुमचे गुणगाण आहोरात्र,
फुकाच्या घोषणा करू दिनरात्र,
लाखभर देऊ, अपंगास;
करोड देऊ, मरणाऱ्यास,
फोटो लाऊनी तुमचा,
अश्रु ढाळू...मनापासून...
जाउंदेत तिन चार वर्षे,
होउदेत एकदोन निवडणुका;
मग जातील सर्वजन विसरून;
तेव्हा, तुम्हाला घर देण्यास,
करु जमीन आरक्षीत,
त्या जमीनीत बांधु आमचे महाल,
एक माझ्या बापाला,
एक मला आणि एक सासुला;
तुमच्या आईवडिलांना,
आहेना सेनेची पेन्शन;
मी पडलो, मुख्यमंत्री,
मला कोण वाली....म्ह्णुन
बांधली घरे तुमच्या रक्तावर...
बांधले मनोरे तुम्च्या आदर्शावर...
म्हणुनच नाव ठेवले नाव 
आदर्श सोसायटी.....
माझे आदर्श जपूण
शहीदांनो तुमच्या साठी


-
डाँ.संदीप पाटील.

No comments:

Post a Comment