Pages

Saturday, March 27, 2010

मराठी तेतुकी मिळवावी ....महाराष्ट्र धर्म वाढवावा !!!

समर्थ रामदासांचा उपदेश...मराठा तेतुका मिळवावा असा होता. पण आज कालच्या ग्लोबलायजेशनच्या युगात....आता आपल्याला खरच हा उपदेश बदलुन मराठी तेतुकी मिळवावी असा करावा लागेल!!!
पुण्यात आज साहित्य प्रेमाचा उच्चांक गाठला गेला आहे. निमीत्त आहे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे!!! पण राहून राहून हाच प्रश्न मनात येतो...या तीन दिवसानंतर काय? ही गर्दी ....हे पेपरमधील लेख ...ह्या टेलीव्हीजन वरील चर्चा....सारे सारे एका थंड हवेच्या झुळूके प्रमाने आहे. थोडा वेळ...अल्हाददायक वाटेलही...पण नंतर जीवाची लाही लाही ....होईल. जेव्हा हे स्पर्धात्मक युग समोर येईल...तेव्हा अमृताशी ही पैजा जिंकणारी ही आपली माय बोली आपसूक एका कोपऱ्यात जाईल...आणि वाघीणीचे दुध प्यायलेली आंग्ल भाषा डोईजड होईल.
मग मराठीचा वाली कोण असा प्रश्न नक्की तुमच्या मनात येईल. काही राजकारणी या प्रश्नांच उत्तर काही सेंकदातच देतील. पण हा काय काही सेंकदाचा प्रश्न नाही तर हा आहे युगा युगाचा प्रश्न आणि याचे उत्तरही आपल्या पिढ्या-पिढ्यांना द्यावे लागणार आहे. याचे उत्तर आहे....करोडो मराठी जनांच्या मनात!!! उगाच काही लोकांना मारून मराठी लोकप्रिय होणार नाही....तर मराठीला लोकमान्य होण्यासाठी तिच्याच सुपुत्रांनी तीचा वापर कटाक्षाने दैनंदिन व्यवहारात केला पाहीजे...मग तुम्हाला विशेष कष्ट घ्यावे लागणार नाही. आपसुकच तुमच्या समोरच्या माणसाला मराठीतच बोलावे लागेल.
काही लोक याला विरोध करतील...आम्हाला आमच्या कार्यालयात इंग्रजी बोलण्यावाचून गत्यंतर नाही असे म्हणतील.ठीक आहे माझा यालाही विरोध नाही. तुमच्या कामकाजाची भाषा वेगळी असू शकते पण तुम्ही रस्त्यात, चित्रपटगृहात, दुकानात, लोकल मध्ये स्पष्ट मराठीतुन वार्तालाप करु शकता. आंग्ल बोलणारे उच्च असतात असे काही नाही....युरोपात पहा फ्रांन्स मध्ये लोक फ्रेंच मध्येच बोलतात...जर्मनीत लोक जर्मनीतच ....मग महाराष्ट्रात लोक मराठीत का बोलू शकत नाही.
सरते शेवटी मराठी बोलणे एक...पिढ्यां-पिढ्यांनी आपल्याला दिलेले एक वरदान आहे...जगाच्य इतिहासात अशा अनेक भाषा उद़्याला आल्या आणि लोप पावल्या. आज आपली भाषा अशाच एका स्थिंततरातून जात आहे. आपण सर्व जर एकत्र आलो तर ह्या वळणाला आपण हवा तो आकार देऊ शकतो...आणि नवा इतिहास घडवू शकतो.
जय हिंद!!! जय महाराष्ट्र!!!

ता.क. अशुद्ध लेखना बद्दल आणि व्याकरणाच्या चुकांबद्दल जाणकारांची क्षमा असावी......मत महत्वाचे...आशय जाणुन घ्या.

No comments:

Post a Comment